गणेश चतुर्थी अभंग

 गणेश चतुर्थी 


काय उकळते 

मातीच्या चुलीवर 

उतु जाते प्रीत 

प्रातःकाळी!


कोणाच्या शोधात 

पडती पाऊले 

आमंत्रण देई 

गणेशासी…


गणेश चतुर्थीचा 

उत्सव हा मोठा 

आनंदाला नसे 

पारावर!


विद्येची देवता 

गणराज माझा 

वाहू दे सर्वथा 

ज्ञानसागर!


पाठोपाठ येई 

गौरी आवाहन 

सगळीकडे होते 

भरभराट…


परमेश्वराची कृपा 

राहो सर्वांवर 

आनंदी राहोत 

पोरीबाळी!


अनाहूत 


Comments

Popular Posts