वीरगति

त्वरित हसावे त्वरित रडावे 
सांग तुझे मन स्वैर किती 
पाहून तुजला काय करावे 
संथ होत असे माझी गती 

काय कारणे खेळ मांडला 
करून बैसलीस कोण पती
त्याच्या जवळी गाडी न बंगला 
म्हणुन तोडलीस का नाती? 

तुझ्या छायेत जरा पहुडलो 
भ्रष्टच झाली माझी मती
लोक प्रेमभंगानंतरही 
मिलनाचीच गाणी गाती 

व्यर्थ आहे हे प्रेम ज्यामुळे 
समग्र खुंटे अपुलि प्रगती
ध्येय प्राप्तीचा तप करता 
त्यातुन येईल वीरगति 


-Anahut

Comments

Popular Posts