मला तो मुलगा व्हायचंय

मला तो मुलगा व्हायचंय...


मी तुझ्यासाठी नवखा आहे, मान्य आहे
तु ही माझ्यासाठी नवखी हेही मान्य आहे

पण एक गोष्ट ऐक -
काही काळानंतर,
तुझं लग्न होईल
तुला मुलेबाळे पण होतील,
तू म्हातारी देखील होशील

कदाचित् तू विचार करशील की -
‘माझ्या आयुष्यात मला मिळालेला
तो मुलगा किती भकास, रटाळ होता?
तो मला भेटायलाच नको होता!’
किंवा असा देखील विचार करशील की-
‘मी कदाचित तेव्हा भेटलेल्या मुलाशीच
लग्न करायला हव होत, म्हणजे -
आयुष्य खूप रसपूर्ण झालं असतं!’

आणि तू जेव्हा केव्हा भूतकाळात जाऊन विचार करशील
तेव्हा तुझ्या आठवणीतला मला तो मुलगा व्हायचंय!
आणि म्हणुनच, मी तुला चांगला वाटेल अथवा रटाळ
मला तुझ्या आयुष्यातला तो मुलगा
तो भूतकाळ व्हायचंय!!!

  • अनाहूत

Comments

Popular Posts