त्रास आहे

... त्रास आहे 

अन्न पाण्यावाचून येथे जीव तुटतो
क्वचित नव्हे हा नेहमीचा त्रास आहे

उलट मार्गाने आपण जात आहोत
वाघ येथे हरिणी चा घास आहे

तुमचे रडगाणे का ऐकवता हो
सर्वांचेच आयुष्य भकास आहे

गुलाबाच्या काट्यांचे काय घेऊन बसलात
येथे तर पंकज देखील उदास आहे

ज्ञान विद्या सर्व आता व्यर्थ होईल
गणेश ही इथे लक्ष्मी चा दास आहे

काय केल्यावर शोषण संपुष्टात येईल
जाऊ द्या तो शोषितांचा त्रास आहे


"प्रश्न आले प्रश्न गेले, संकटांनी वार केले
परि वार माझ्यावरती करता, संकटांना त्रास आहे"


-अनाहूत


[The last verse in this poem is not a part of this poem but it's just a verse which I wrote to motivate myself and understand the strengths I have] 

Comments

Popular Posts