... मोहात मी
...मोहात मी
पाहता एका क्षणी 'ती'स धुंद अन् बेधुंद मी
मनी उठे काहूर तरीही बाह्यरुपी शांत मी
संभाषण सुरु करण्या वाट पाहता लोचनी
पाहता एका कटाक्षे, कावरा-बावरा जणू मी
सुंदर ते ध्यान, नक्षीदार छबि, दरवळे गंध वातावरणी
होती एकटी बसली अन् लगोलग बसलेलो मी
लटांचा त्या स्पर्श अद्वैत भासे, वसंतात त्या रंग धुंडीत मी
लटातून उठत्या तरंगांत वाहे, माझ्यातला एक नवखाच मी
त्रिफळाचीत झालाय जणू, निःशब्द शब्दांचाही धनी
तुझे बोल कानात झंकारले नि हरलो स्वतः तुज मोहात मी
नारळ, तुकडा वा मीठ-मिरची, कशाने तुझी दृष्ट काढू सये
बंदिस्त वेड्या मनातिल सारे, कसे भाव हे मांडू रचनेत मी
तुझ्या ही मनीची विचलता कळाली, नजरेत संवाद नादावले
भले लोक आम्हास सांगून गेले, परी तोल कैसा सांभाळू मी
चला मानले तुज सर्वस्व आता, भविष्याची तरीही नसे शाश्वती
जरी मोह आज तुझा जाहला, परी उद्या काय ठावे कोणाच्या मोहात मी
-अनाहूत
There is an interesting story behind this poem. I was attending MOOD INDIGO at IIT-B. when I entered for stand up comedy show of "Biswa Kalyan Rath' , there was very beautiful girl sitting beside me. There were many seats vacant but she chose to sit beside me. She was the prettiest girl I have seen in my lifetime (till then😉) . I just tried to write what exactly happened there. I had to stop writing the poem because finally Biswa arrived and the show started. Everything was very instantaneous... After that day I never saw her again so I just came up with the last two lines and finished it!😄
Comments
Post a Comment