मनीचे भाव

मनीचे भाव 

येती मला ही स्वप्ने अन्‌ आठवणी तुझ्याही
मग शब्द-श्वास माझे मी व्यर्थ का करावे...

चुकलेच शब्द सारे अन्‌ 'काफिया' ही माझा
वाचुनी त्यास तुम्ही, मज माफिया म्हणावे...!

बेधुंद त्या आकांक्षा, मग्रूर त्यात तुम्ही
दगडासही पाझरे, तुम्हांस काय व्हावे... ?

खरे रंग-रूप तुमचे तुम्ही ना दर्शवावे
बोलुन भाव सारे मी माझ्यात ना उरावे...

स्वार्थात सर्व जगलो, तरीही ना सावरलो
विसरूनी मग स्वतःला इतरांसी सावरावे...

असंतुष्ट, अमानुष अन्‌ वासनांध भावा
स्वतःस घडवुनि मग राष्ट्रासी उद्धारावे...!

आताच लिहिले मी हे खरे काव्य माझे
आता तू ही राणी गणेशासी गुनगुनावे...!

-अनाहूत

After long time, I tried to write something... And also tried to write something out of the box (as I never wrote anything other than love in Marathi)... सहज केलेला एक प्रयत्न... 😊
(Suggestions are always welcome*)

Comments

Popular Posts