काय करावे...

तुझ्या घराच्या वाटेवरती काय करावे
विचारमंथन करताना मग काय करावे
ताळमेळ आपला जुळवण्या काय करावे
तूझ्या परीक्षेत यश मिळवण्या काय करावे

बोललो न मी तुला कधीही खोटे राणी
वाढतात स्पंदने मनीची तुला पाहूनि
उत्कटता ही किती वाढते गनती नाही
ह्दयाचाही थांग हरवला काय करावे

काय सांगू मी तुला तू मजला कशी वाटली
मी तुला जसा वाटलो तू मला तशी वाटली
वाटणेच मग बंद होऊ नये या वाटेवरती
वाटही साधी गवसत नाही काय करावे

तुला जाणण्याचा प्रयत्न सुरूच आहे
तूही तो करायल्यागत भासत आहे
काळवेळ अन् स्वप्नातही तू माझ्यासवे
पण तुझ्या मनीचे भाव शोधण्या काय करावे

तुझ्याच समृद्धीसाठी मी नवस बोलला
स्वार्थी प्रपंच करणे काही मला रुचेना
तुझ्या साथीविन दूसरे काही मला सुचेना
आयुष्याचे गणित सुटेना काय करावे

व्यक्त होऊ दे भाव सखे तुझ्याही मनीचे
भावांचे त्या खचित् विस्मरण न व्हावे
मीही कागद काळे करतो पुन्हा नव्याने
पुनरुक्तीचा दोष मिटवण्या काय करावे

- अनाहूत

Comments

Popular Posts