वाचा आणि गप्प बसा - १
(१) कुठे नेवून ठेवलाय माझा महाराष्ट्र?
संतभूमि म्हणुन ओळखला जाणारा माझा हा महाराष्ट्र. त्याच संतपरंपरेतले प्रमुख संतपंचक संत ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम, एकनाथ आणि समर्थ रामदास होय. एकोणीसाव्या शतकाच्या अखेरीपर्यंत त्यांच्या अनुयायांत एकवाक्यताच दिसून येते. कारण ज्ञानेश्वरी, भागवत, गाथा, दासबोध यात अध्यात्मशास्त्रतिल महत्वाचे सिद्धांतच सांगितले आहेत. समर्थ आणि तुकाराम महाराज हे समकालीन संत. यांच्यात तर परस्पर प्रेमआदराचे नाते होते. यामुळे पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात समर्थांनी स्थापलेल्या मारुती मंदिराच्या दगडी भिंतीवर - 'शरण शरण हनुमंता/ तुज आलो रामदूता //' हा तुकाराम महाराजांचा अभंग कोरला आहे. या उभयतांमध्ये भेद असता तर विठ्ठलमंदिरात मारुती स्थापन करता आला असता काय?
या उभयतांनी एकमेकांवर काव्यरचना केली आहे. ती वाचली तरी यांच्यात भेदाभेद करणे अमंगळ असल्याची खूण पटावी.
संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची रचना-
हुरमुजी रंगाचा उंच मोती दाणा/
रामदासी बाणा या रंगाचा /
पीतवर्ण कांती तेज अघटित/
आवाळू शोभत भृकुटीमाजी//१//
काष्टांच्या पादुका स्वामींच्या पायात/
स्मरणी हातात तुळशीची /
रामनाम मुद्रा द्वादश हे केले/
पुच्छ कळवळी कटीमाजी//२//
कौपिन परिधान मेखला खांद्यावरी/
तुंबा कुबडी करी समर्थांच्या/
कृष्णा तटाकाठी जाहले दर्शन /
वंदिले चरण तुका म्हणे //३//
समर्थ रामदासकृत रचना-
धन्य तुकाराम धन्य तुझी वाणी/
ऐकता उन्मनी दीप लागे //१//
धन्य निस्पृहता एकविध निष्ठा /
श्रुतिभाव स्पष्टा दाखविसी //२//
संतोषले चित्त होतांचि दर्शन /
कळों आली खूण अवताराची //३//
घातलासे धडा नामाचा पै गाढा /
प्रेमें केला वेडा पांडुरंग //४//
नवविधा भक्ति रूढविली जगीं /
तारूं कलियुगीं दास म्हणे //५//
यावरून स्पष्ट दिसून येते की, त्यांच्यातील ऋणानुबंध खूप जुना आहे. पण आजकालचे कपाळकरंटक राजकारणी यांच्या नात्यावरही चिखलफेक करण्याचे काम करत आहेत त्याच्या म्हणण्यानुसार तुकाराम महाराजांची वैकुंठरथाची कथा भंपक असून रामदास स्वामींच्या अनुयायांचे त्यांना संपवण्याचे कारस्थान होते.अरे निदान साधू संतांना तरी तुमच्या राजकारणाचा भाग बनवू नका.
एखादा खोटा प्रसंग वर्णन करायचा अन् समाजात फूट पाडायची, देश-प्रदेश अस्वस्थ करून स्वतःच्या भाक-या कशा भाजायच्या यातच वेळ, युक्ती, अन् शक्ती घालवायची अन् उलटा आपणच सवाल करायचा 'कुठे नेऊन ठेवलाय माझा महाराष्ट्र ?'
संदर्भ - 1.'राष्ट्रजागर' - सच्चिदानंद शेवडे
2.'दासबोध'

Comments
Post a Comment