नकोच आता...

नकोच आता.........


परतून येणे तुझ्याच गावा नकोच आता
वाजवने दु:खाचा पावा नकोच आता//

कळवळलेला प्राण जाहला व्याकुळ राणी
झालर त्याला तव स्नेहाची नकोच आता//

बोलून घेवू स्पष्ट मोकळे मनातलेही
खोटे खोटे हसने अवचित नकोच आता//

वाट पाहिली तुझ्या विखारी संदेशांची
जीव लावने पुन्हा एकदा नकोच आता.//

तुझ्यानि माझ्या वाटेवरती चंद्र पहुडला
तुला तयाची द्रुष्ट लागने नकोच आता.//

तुझ्या मनाच्य़ा कड्याकपारी कोण राहते
छ्डा लावने त्वरीत तयाचा नकोच आता/./

संचित ठेवू जपून आपले प्रेमभराने
पुनरुक्तिचा दोष लागने नकोच आता..

जीवाची घालमेल होत असतानाचा काळ खराच जीवाला हुरहुर लावनारा आहे.
यशप्राप्तिपूर्वीची हि अगतिकता कधीही नष्ट होवू नये असेच वाटते.

Written by - (My Uncle) Prashant Dharmadhikari
Source blog: 'Mahashweta'
Follow:
http://mahashwetaa.blogspot.com/

Comments

Popular Posts