वाट पाहतो आहे...

वाट पाहतो आहे तिची काकुळतीने
झाकलेय मी मनही माझे भीतीने

चिडचिड होतो हल्ली वरवरच्या गोष्टीने
तू मात्र हाताळतेयस सर्व सहजपणाने

आमोरासमोर गप्पा झाल्या गावभराच्या
मग आता का छळतेस मज दुर्लक्षाने

बरे वाईट न बोलायचे ते बोलत होतो
खंत वाटते नेमकेच राहून गेल्याने

जो जो तुला विसरण्याचा प्रयत्न करतो
तो तो बहरून जातो तुझ्या आठवणीने

तू मजला गं राणी आता नको त्रासवू
खूप छळले आहे आधीच आयुष्याने

-अनाहूत 

Comments

Popular Posts