प्लीज...मला राखी बांधू नको...तू माझी बहीण नाहियेस...!!!

I liked it very much so posted-

आज राखीपौर्णिमा... वातावरण उत्साहाचे...
काॅलेजमध्ये खूप कमी जण लेक्चर एटेंड करत होते... बहूतेकजण कट्यावर बसून कोण कोणाला राखी बांधली आणि अजून कोणाचा कोणाला राखी बांधायचा प्लान आहे याचीच चर्चा करत होते.
जोक्स, कमेंट्स पास होत होते... टाळ्या पडत होत्या... थट्टा, मस्करी केली जात होती... टर ऊडवली जात होती... एक टिप्पीकल म्हणावे असे त्या काॅलेज कट्याचे वातावरण होते.
बरेच ग्रूप होते...काही मुलांचे, काही मुलींचे, आणि बहूतेक मुला-मुलींचे! सगळ्या ग्रूपमध्ये साधारण वातावरण तसं टिप्पीकलच! आज कोणीतरी कोणालातरी राखी बांधावी आणि बस्स! त्याचीच चर्चा सगळ्यांनी आपापल्या तोंडचा मिठ-मसाला लावून आपापल्या ग्रूपमध्ये पुन्हापुन्हा सांगावी...हाच ऊद्योग चालला होता.
पण एका मुलींच्या ग्रूपच्या लीडरला (अशा प्रत्येक ग्रूपला एक अघोषित असूनही स्वयंघोषित आणि तरीही सर्वमान्य असा एकतरी लीडर असतोच!) अचानक काय वाटले काय माहीत, पण तिने एक टूम काढली...चला, आज मी आख्ख्या 'ताबडतोब' ग्रूपच्या पोरांना माझा भाऊ बनवणार! (ताबडतोब हे एका मूलांच्या ग्रूपचे नाव आहे बरं!) आईडिया होतीच अशी की, कोणी नाही म्हणूच शकले नाही.
मग काय? निघाल्या विरांगना मोहिमेवर!
ईकडे 'ताबडतोब' ला जोपर्यंत याची खबर लागली (शेवटी मूलीच त्या...कोणीतरी कोणालातरी काहीतरी सांगितले असणार किंवा ते तसे सांगताना तिस-याच कोणीतरी ऐकले असणार आणि बातमी व्हाया व्हाया 'ताबडतोब' पोचली असणार!) तोपर्यंत खूपच ऊशीर झाला होता... इतका की कट्यावरून पलायन करणार इतक्यात तर मुलींच्या ग्रूपने जवळजवळ वेढाच घातला होता!
नाईलाजाने, एकेकाने ताबडतोब राख्या बांधून घ्यायला सूरूवात केली...आता बारी लीडर टू लीडर रक्षाबंधनाची होती!
तर हा म्हणतो कसा? "प्लीज...मला राखी बांधू नको...तू माझी बहीण नाहियेस...!!!"
"हो का? मग मला तुझी बहीण आहे असं समज ना?"
"ठीकाय...! मग तू पण मी तुझ्याकडून राखी बांधली असं समज..?"
"मग अॅक्च्युअली राखी बांधायला काय प्रोब्लेम आहे?"
"प्रोब्लेम असा काही नाही, पण मी तूझ्याकडून राखी बांधून घेऊ शकत नाही इतकच."
"पण का?"
"सांगितलं ना? तू माझी बहीण नाहीयेस म्हणून!"
"मग कोण आहे मी तुझी?"
"सध्या तरी कोणीच नाहीयेस. पण तुझी इच्छा असेल तर माझी मैत्रिण होऊ शकतेस... आणि तुला मला राखी का बांधावी वाटतेय पण? गरज काय आहे तुला याची?"
"गरज अशी काही नाही, पण असंच..."
"असंच..???"
"अरे म्हणजे....."
"मला माहितीये. तुला मला राखी बांधावी वाटतीये कारण मग तुला मी माझी बहीण मानेन, असं तुला वाटतंय. आणि मग मी तुला वाईट नजरेनं पाहणार नाही, तुझ्याबद्दल तसा विचार करणार नाही, तुला इतर वाईट पोरांपासून संरक्षण देईन वगैेरे वगैरे...हो ना?"
"हो...म्हणजे अगदीच काही तसं नाही...पण...."
"सोड ना, अगदीच ऊघड आणि स्पष्ट सांगायचं झालं तर तुला सर्वप्रथम माझ्याचपासून संरक्षण पाहिजे आहे... कारण मी जरा दांडगट, गूंड टाईप दिसतो ना...माझा काय भरवसा, जर कधी पुढे-मागे माझ्या मनात काही भलतंसलतं आलंच तर काय घ्या! हो ना? असं म्हणजे अगदी अस्संच ना?"
तिची नजर जरा पाणावली...मान किंचीत खाली झुकली... आणि ती काही बोलणार इतक्यात तोच म्हणाला...
"डोन्ट वरी... तुझी जर मला राखी बांधण्याच्या बदल्यात माझ्याकडून इतकीच अपेक्षा असेल तर तुला खरंच मला राखी बांधायची गरज नाही."
तिने चमकून वर पाहिले तसं तो पुढे म्हणाला, "मी माझ्या मैत्रिणींसोबतसुद्धा अगदी अस्संच वागतो"
"म्हणजे?"
"म्हणजे कोणत्याही मुलीचा आदर करण्यासाठी मला तिला माझी बहीणच मानले पाहीजे असं काही नाहीये, ऊलट एखद्या अनोळखी मुलीचाही मी तितकाच आदर केला असता जितका मी माझ्या सख्ख्या बहीणिचा करतो..."
"पण...."
"पण काय? मला माझ्या वासनांना अावर घालण्यासाठी या असल्या रंगीत फँसी डिझाईनच्या दो-याची कसलीच गरज नाहीये... माझा मी हे करू शकतो. आणि जो आपल्या वासनांना आवर घालू शकत नाही, त्याला असल्या हजार राख्या तर काय, पण खरंखूरं आणि तेही सख्ख्या बहीण भावाचं नातंही आडवं येत नाही...! निघतो मी. बाय!"
क्षणभर तिला काय होतंय कळलंच नाही... तिचं डोकं पूरतं शांत व्हायच्या आत तर तो दिसेनासाही झाला होता...
पण मग तिच्या चेह-यावर होतं एक प्रसन्न असं स्मित! तिचा चेहरा आनंदाने ऊजळून गेला होता... तो आनंद होता एक नवीन व्यक्ती तिच्या आयुष्यात आल्याचा... एक भावाच्या तोडीचा मित्र भेटल्याचा... एक भरवशाचा माणूस भेटल्याचा.....


- अनाहूत

Credits:-concept by सागर कुलकर्णी (SVK Engineers) 

Comments

Post a Comment

Popular Posts